Top News पुणे महाराष्ट्र

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

पुणे | आज लाखो मजूर रस्त्यावरून चालत जातायत. यात मोठ्या संख्येने स्त्रिया देखील आहेत. रणरणत्या उन्हात आपल्या लेकरांना घेऊन चालत जाणारी ही लोक पाहून जीव कासावीस होतो. या स्त्रिया चालत जात असल्या म्हणून काही त्यांची मासिक पाळी चुकणार नाहीये. म्हणूनच रस्त्याने चालत जाणाऱ्या या महिलांसाठी आपण आपल्या भागात सॅनिटरी पॅडची सोय करावी, अशी विनंती राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या पक्षातील सहकारी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे

हातावर पोट असणाऱ्या या माऊलींकडे खायचे पैसे नाहीयेत. तिथं त्यांच्याकडे सॅनिटरी पॅड असतीलच अस नाही. अश्या अवस्थेत सतत चालल्याने त्यांच्या त्रासात ही भरच पडणार आहे. एकुणात ही अवस्था कोणत्याही स्त्रीसाठी अतिशय वाईट आहे. अश्या स्त्रियांसाठी एक महिला म्हणून मला असं वाटतं की आपण यांना शक्य तशी मदत करायला हवी, अशा भावना चाकणकर यांनी व्यक्त केल्या.

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना अशी विनंती करते की, रस्त्याने चालत जाणाऱ्या या महिलांसाठी आपण आपल्या भागात सॅनिटरी पॅड ची सोय करावी. ज्या महिला जिथं अडकल्या असतील तिथं त्यांना हे पॅड मिळावेत यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत.अश्या तऱ्हेने आपण या आपल्या आयाबहिणींचा त्रास काही अंशी कमी करू शकतो. आणि आजच्या या संकटाच्या काळात हीच सगळ्यात मोठी गरज आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील चाकणकर यांच्या विनंतीला मान देईन याबाबत नक्कीच निर्णय घेऊ, असा शब्द दिला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड

निधीची गरज लागल्यास मागणी करा, तात्काळ देतो; अजितदादांचा पुणे महापौरांना शब्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या