बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 600 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 47 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 915 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,99,721 इतकी आहे. तर पुण्यात 44 हजार 822 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,49,373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 17 हजार 389 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा, मात्र तरीही ‘ही’ एक गोष्ट पडू शकते महागात!

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर; भारतातील ‘या’ मैदानावर होऊ शकतो T20 World Cupचा पहिला सामना

आयपीएल सुरु होण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का, ‘ही’ भविष्यवाणी खरी ठरली तर…

काल जुळ्या मुलांना दिला जन्म, आज कोरोनामुळे आईचा मृत्यू

आयपीएल सुरु होण्याआधीच धोनी फुल्ल फॅार्ममध्ये; CSKनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More