बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Tokyo_Olympic2021 कांस्यपदक मिळवुन पी.व्ही सिंधु ठरली दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला

नवी दिल्ली | ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळवुन पी.व्ही सिंधु ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 2 पदकं मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

आज कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिआओवर दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चीनच्या खेळाडूला चारी मुंड्या चीत करून सिंधूने तिच्यावर विजय मिळवल्याने तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पी. व्ही सिंधूने सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत. तसेच तिच्या या विजयामुळे ती ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 2 पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला तर दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.

सलग 2 पदके प्राप्त करणारा भारतीय खेळाडू म्हणून यापूर्वी सुशीलकुमारच्या नावे विक्रम नोंद करण्यात आला होता. आता सिंधूने आपल्या नावे विक्रमाची नोंद केली आहे. त्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोनामुक्त होतंय! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! रिक्त पदे भरण्याचा शासननिर्णय जारी

“भारतमातेचं नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघालेत”

यंदा गणेशोत्सव साजरा होणार; लालबागच्या भक्तांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी

सर्वसामान्यांना मोठा धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More