देश

”जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ”

नवी दिल्ली | चीनच्या मुद्यावरून सवाल विचारणारे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे.

नड्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर द्यायला ते काय माझे शिक्षक आहेत का? मी का त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

जेपी नड्डा माझे प्रोफेसर आहेत का ज्यांना मी उत्तर देत फिरु. मी देशाचे शेतकरी आणि जनतेला उत्तर देणार. मी त्यांचा आवाज उठवणार. कुणी कितीही टीका केली तरी मी लढणार, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा आंदोलनाचं सन्मानच करत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी बोललं तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. सत्ताधारी बोलताना कोणताही विचार करत नाहीत. संघाची त्यांना तशी शिकवणच आहे. मात्र बोलण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, त्यामुळे…’; अण्णा हजारेंचं मोदींना पत्र

“राज्यात महाविकासआघाडीच्या तुलनेत भाजप 20 टक्के देखील नाही”

भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या