देश

राहुल गांधींचं ममतांना समर्थन तर काँग्रेस खासदार म्हणतात मुख्यमंत्री नाटकं करतात!

कोलकाता | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संविधान बचाव धरणे आंदोलन पाठींबा दिला आहे तर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी नाटक करत असून करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे, असं म्हटलं आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यामुळं काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींना पाठींबा देण्याविषयी दोन मतप्रवाह असल्याचं दिसत आहे.

सीबीआयनं पश्चिम बंगालच्या पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर धाडं टाकल्यामुळं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संविधान बचाव धरणे आंदोलन करत आहेत.

सर्व विरोधी पक्ष तुमच्या सोबत उभे असून ते फॅसिस्ट शक्तींचा पराभव करतील, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सीबीआयला आदेश देत आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सरदार पटेलांनी ‘RSS’ विरुद्ध केलेल्या कारवाईची सत्तरी; तरुणांकडून इतिहासाची उजळणी

मी जगातील सर्वात अभिमानी पती- रणवीर सिंग

मुख्यमंत्र्यांना ट्रेंडिंगमध्ये आणण्यासाठी आलेल्या काजल, रिया, श्रेया, भावना ट्रोल

नरेंद्र मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय- अरविंद केजरीवाल

मोदींच्या प्रेमापोटी केलं होतं लग्न; आता मात्र तिचं-त्याचं जमेना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या