बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यभरात पावसाची संततधार! ‘या’ भागात ढगफूटीसह दरड कोसळली; पाहा व्हिडीओ

औरंगाबाद | राज्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतिक्षा होती. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. काल भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून राज्यात पूढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर काल रात्रीपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त आहे.

औरंगाबाद जिल्हात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील भिलदरी पाझर तलाव फुटल्याने तेथील नागद भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव जिल्हातील चाळीसगाव आणि औरंगाबाद जिल्हातील कन्नड तालुकाच्या सीमा भागात ढगफूटीसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. जिल्हातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळल्याने महामार्ग बंद आहे. औरंगाबादमध्ये सर्वच नदीनाले तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. बनोटी येथील हिवरा नदीला पूर आल्यामुळे पुल वाहून गेला आहे. त्यामूळे गावांचा संपर्क तूटला आहे. पुल नसल्याने मदतकार्यास अडथळा होताना दिसत आहे

दरम्यान, बीड जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील कूंडलिका नदीला पूर आल्याने राजेवाडी येथील बंधारा तुडूंब भरला आहे. बीड शहरातून जाणारी बिंदुसरा नदी दमदार पावसामुळे वाहू लागली आहे. जिल्ह्यातील आंबेसावळी येथील मनकर्णिका नदीला पुर आला आहे. जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपत होती. मात्र, कालपासून पडणाऱ्या पावसामुळे पिकांना नवसंजीवणी मिळाली आहे. जिल्हातील मोठी धरणे अद्याप भरलेली नाही, त्यामुळे जास्त पावसाची गरज आहे.

अहमदनगर जिल्हाच्या पुर्व भागात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात चांगल्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. आखेगाव येथील नंदिनी नदीला पूर आल्याने शेजारील गावात पूराचे पाणी शिरलं आहे. जिल्हातील सीना नदीला पूर आल्याने नगर कल्याण महामार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे एकूणच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार पडेल, तर काही भागात अतीमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या शेतात सोडल्या मेंढ्या, पाहा व्हिडीओ

यंदाही मिरवणुकीला बंदी; पुण्यात गणेशोत्सवासाठी ‘ही’ नियमावली लागू

समंथाने का हटवलं आपल्या नावासमोरील नवऱ्याचं आडनाव?, पाहा व्हिडीओ

एकाच सोसायटीमध्ये तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ ; पाहा व्हिडीओ

“आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More