Top News महाराष्ट्र मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाला कोरोनाने वेढा दिला आहे. राज ठाकरेंच्या घरी घरकाम करण्याऱ्या 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे.

कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. यानंतर त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. काल तर एकाच दिवशी पाच हजार रूग्ण आढळून आले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारचा मोठं पाऊल, पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय गृहमंत्र्यांनी केला जाहीर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली दिलासादायक बातमी

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

भारतात कोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला… मागच्या 24 तासांतली सर्वांत धक्कादायक आकडेवारी

सुट्टी संपल्यावर शिक्षकांनी वर्गखोल्या उघडल्या; अन समोर आला धक्कादायक प्रकार…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या