“काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं?”

सोलापुर |  काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं?, असे एक ना अनेक प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला आजच्या सोलापुरातल्या सभेत विचारले आहेत.

स्मार्ट सिटी मध्ये सोलापूर होतं, काय झालं सोलापूरच? असा प्रश्न विचारून त्यांनी सोलापुरकरांना विचार करायला भाग पाडले.

नाशिक मध्ये आमच्या सत्ताकाळात आम्ही उद्योगपतींच्या सहकाऱ्याने आम्ही जे उभारलं ते भारतीय जनता पक्ष स्मार्ट सिटीच्या नावावर खपवतंय, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

नरेंद्र मोदींवर देशातील लोकांनी भरभरून प्रेम केलं, त्यांना प्रचंड बहुमत दिलं पण मोदींनी देशाला, जनतेला फसवलं. आज ते शहीद जवानांच्या नावावर मतं मागत फिरत आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-“आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना रोजगार द्या; आपल्याला आरक्षणाची गरजच नाही”

-आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही थापा किती मारल्या हे मोजा- राज ठाकरे

-भाजपला मतदान करा; मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो- नितीन गडकरी

-‘जिवंतपणी कधी तुम्ही विचारपूसही केली नाही’; पर्रिकरांच्या मुलानं पवारांना पत्र लिहून व्यक्त केला संताप

-राजू शेट्टी म्हणतात, इचलकरंजीत उद्या इतिहास घडणार कारण प्रचाराला राज ठाकरे येणार