Top News

मी पक्षाचा झेंडा बदललाय, भूमिका नाही; राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलला आहे. तसेच त्यांनी आपली भूमिकाही बदल्याची चर्चा होत होती. मात्र, राज ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं असून मी पक्षाचा झेंडा बदललाय, भूमिका नाही, असं ते म्हणाले आहेत. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही. एक उदाहरण देतो, पाकिस्तानी कलाकारांना हिंदुस्थानांतील चित्रपटसृष्टीत काम करू देण्याला यशस्वी विरोध केला होता, रझा अकादमीच्या लोकांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत फक्त मी दाखवली, असं राज म्हणाले आहेत.

अनधिकृतपणे बांग्लादेशी टॅक्सी, रिक्षा चालवत होते त्यावेळी आमच्या आंदोलनामुळे त्या टॅक्सी, रिक्षा कापल्या गेल्या. तेव्हा तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष कुठे होता? माझ्या झेंड्यात जरी आज बदल झाला असला तरी माझ्या पक्षाची भूमिका ही आधीपासून हीच आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महाअधिवेशनच्या भाषणात जे म्हणालो होतो तेच मी पुन्हा आज सांगतोय, माझ्या मराठीला जर नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर जाईन आणि हिंदुत्वाला नख लावायचा प्रयत्न केलात तर हिंदू म्हणून अंगावर जाईन. त्यामुळे मराठीचा मुद्दा सोडला आणि हिंदुत्वाचा धरला असं काही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है- रूपाली चाकणकर

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

महत्वाच्या बातम्या-

माझा ‘हिंदुहृदयसम्राट’ किंवा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करु नका- राज ठाकरे

क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ राहीला नाही- कपील देव

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या