चटके फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीत- राज ठाकरे

मुंबई | चटके-फटके खाल्ल्याशिवाय पुढे जाता येत नाही; मग तो उद्योग असो किंवा राजकारण, त्यामुळे जिद्द आणि हिंमत असेल तर तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकता, असा उपदेश राज ठाकरेंनी तरूणांना दिला आहे. मी उद्योजक होणार या कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका, आपल्या राज्यात काय दडलंय हे ओळखा आणि पुस्तकं वाचून धंदा करण्याच्या फंदात पडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, आपला मराठी माणूस वडा-पाव विकतो, म्हणून आपलेच लोक हिणवतात. पण तोही धंदाच आहे. त्यातूनही तो चांगले पैसे कमावतोय. घाबरून कुठलीच गोष्ट करता येत नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-महिलांचा अवमान करणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मिळणार तरी कसे?

-महिलेकडून शरीरसुखाची मागणी; त्रासाला कंटाळून तरूणाची अात्महत्या

-70 टक्के पेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत; शक्ती कपूर यांचं मोदींना मध्यस्तीचं आवाहन

-धक्कादायक!!! व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगमुळे एकाची निर्घृण हत्या

-#MeToo | महिला प्रगतीसाठी शॉर्टकट वापरतात; भाजपच्या महिला आमदाराची मुक्ताफळं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या