राजकीय हेतूनं गुन्हा, राजू शेट्टींचा उदयनराजेंना पाठिंबा

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दिलाय. फेसबुकवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहिलीय.

४३ हजार एकर जमिनीचे मालक असणारे उदयनराजे यांनी २ लाखांची खंडणी मागितली ही न पटणारी गोष्ट आहे. त्यांच्यावरील गुन्हा राजकीय हेतून प्रेरित असावा. त्याचा मी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना निषेध करतो, असं राजू शेट्टींनी म्हटलंय.