Top News

‘त्या’ 9 पोलिसांना निलंबित करा; राम कदम यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. यानंतर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली.

दरम्यान आता यासंदर्भात आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीये. यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेप्रकरणी पोलिसांनी निलंबित करण्याची मागणी केली आहे.

राम कदम म्हणाले, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या 9 पोलिसांना तात्काळ निलंबित करावं. शिवाय या पोलिसांची चौकशी देखील करावी. पोलिसांबद्दल आदर असला तरी अशा पद्धतीची मारहाण योग्य नाहीये.

याच प्रकरणात आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करून त्यांना मारहाण केलीये. या 9 पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करा”

नोव्हेंबर अखेरीस महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल- विजय वडेट्टीवार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी दाव्याला जो बायडेन यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

सिरीयल पुढे सुरु ठेवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड

अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- सचिन सावंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या