Top News महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले

मुंबई | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत कायदा हा सरकारने केला आहे त्यामुळे मागे घेण्याचा प्रश्न नाही, असं आठवले म्हणाले.

दरम्यान, मुंबईत किसान सभेच्या मोर्चा जवळजवळ  20 हजार शेतकरी सामील झाल्याची माहिती समजत आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा; रोहित पवारांनी अर्ध्यावर सोडला कार्यक्रम

‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीत

मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!

‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या