बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई | सध्या महाराष्ट्रात परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनेक राजकीय घडामोडींना उधाण आल्याचं दिसून येत आहे. त्यातच रश्मी शुक्ला या आयपीएस अधिकाऱ्यांवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून भाजपच्या एजंट असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसेच बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या वादामध्ये आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत आणखी मोठा खुलासा केला आहे. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना रश्मी शुक्ला यांनी भाजपबरोबर राहण्यासाठी वैयक्तिक भेट घेऊन आणि फोन करून दबाव आणल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे. त्याबरोबरच, आणखी काय पुरावे पाहिजेत? असंही त्यांनी विचारलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगच्या पत्राबद्दल कळल्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाई करू नये, अशी मागणी करत रडल्या आणि त्यावेळी त्यांना सरकारने माफही केलं असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

या सर्व प्रकरणात जितेंद्र आव्हाड आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सांगितलं आहे. त्यामुळे आव्हाड आता नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसेच फोन टॅपिंग प्रकरणात आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

विमाधारकांसाठी आनंदाची बातमी; अटी पूर्ण होत नसतील तर ‘या’ कालावधीत करू शकता पॉलिसी रद्द

अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क

बाबो! शनया कपूरच्या बिकनीची किंमत आहे इतकी, जाणून घ्या

“आजपासून मी आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही”

ट्रायडंट हॉटेलमध्ये 100 दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात एनआयएचा मोठा खुलासा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More