धनंजय मुंडेंवर १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार!

परभणी | गंगाखेड शुगर्सने केवळ अडीच एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर ५०२ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला होता. मात्र त्यांच्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे आपण त्यांच्यावर १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत, अशी माहिती गंगाखेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी दिली. ते परभणीत बोलत होते.

दरम्यान, हजारो शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याप्रकरणी गुट्टे अडचणीत आलेत. मात्र हा आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलंय.