बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख जाहीर; वाचा संपुर्ण माहिती

कोल्हापूर | कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अनेक भरती प्रक्रिया रखडल्या होत्या. कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना    आता केंद्र सरकारने राज्यांना भरती करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील 78 पोलीस शिपाईच्या पदासाठी लेखी परीक्षा 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी लागणारे हॉल तिकिट हे ईमेलवर आणि पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पोलीस 78 जागांसाठी 2019 मध्ये 15 हजार 767 अर्ज दाखल झाले होती. यातील 75 शिपाई पदासाठी 9 हजार 550 अर्ज आले आहेत. तर बॅंन्ड पथकातील 3 जागांसाठी 6 हजार 217 उमेदवारांनी अर्ज केला आहे. भरती प्रक्रियेत बदल झाले असून पहिल्यांदा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. यातील जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. भरतीची लेखी परिक्षा 3 सप्टेंबरला सकाळी 10 ते 11.30 या वेळेत विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी हॉल तिकिट https://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरून जाऊन डाऊनलोड करता येणार आहे. याबाबत अडचण आल्यास पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या 9699792230 या संपर्क क्रमांकाची मदत घ्यावी, असं आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे यांनी केलं आहे.

दरम्यान, लेखी परीक्षा वेळी उमेदवारांनी ओळखपत्रासह वेळेवर उपस्थित रहावं, तसेच प्रवेशपत्र सोबत नसल्यास परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक हॉल तिकिट घेऊन यावं, असं काकडे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी ???; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीची नोटीस

‘ईडी लावली तर सीडी बाहेर काढेन’; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार

काबूल हादरलं! विमानतळाजवळ मोठा राॅकेट हल्ला; पाहा व्हिडीओ

एकाच दिवसात तीन पदकं! थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारला कांस्यपदक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More