बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील निर्बंध वाढवणार का?, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

पुणे | देशात आता कोरोनाचा नविन व्हेरियंट ओमिक्राॅन विषाणूने (new Corona varient Omicron) डोके वर काढले आहे. केंद्र सरकाकडून राज्यांना निर्देश देण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने देखील खबरदारीचा इशारा दिला आहे याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मह्त्त्वाची माहिती दिली आहे. (Restrictions in Maharashtra will not be increased, said Rajesh Tope)

राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागणार का? निर्बंध वाढणार का?, असे सवाल विचारले जात होते. त्यावर आता राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ओमिक्राॅन या नव्या व्हेरिएंटवर 2 बैठका झाल्या एक टास्क फार्ससोबत आणि एक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर ओमिक्राॅन किती घातक आहे, याची माहिती अद्याप नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

पुण्यात बोलताना राजेश टोपे यांनी निर्बंधांविषयी देखील भाष्य केलं आहे. देशात हा व्हेरिएंट नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर कुठलेही निर्बध वाढवण्याचा विचार नसल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या 12 देशांमध्ये व्हेरिएंट आढळला आहे त्या देशातून येणारे विमान राज्यात बॅन करण्याचा विचार केला असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलंय, त्याचबरोबर केंद्राला पत्र लिहिणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात तासभर चर्चा, काँग्रेस आक्रमक

अभिजीत बिचुकले म्हणतात, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईचं टेन्शन वाढलं! आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More