Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार- राजेश टोपे

मुंबई | दिवाळीनंतर राज्यातील कोरोना रोगाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

या परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावले जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे.

दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याचेही, राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

अर्णब गोस्वामीप्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी!

“…तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या