मनोरंजन

“सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने 90 दिवसांत इतके कोटी खर्च केले”

पाटणा | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच बिहार पोलीसदेखील करत आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहार पोलिसांनी रियाच्या बँक अकाऊंटची माहिती काढली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रियाने गेल्या 90 दिवसांत सुशांतच्या अकाऊंटमधून तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे रियाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती बिहार पोलिसांनी मिळवली आहे.

दरम्यान, सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी वारंवार होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमीपूजन होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली रामराज्य येईल”

कौतुकास्पद! ज्या इयत्तेत नापास झाला पुढे त्याच इयत्तेच्या पुस्तकात छापली आनंदची यशोगाथा

पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप, म्हणाले…

नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींचा ‘तो’ विक्रम मोडला

अमित शहांना कोरोनाची लागण, जितेंद्र आव्हाड ट्विट करून म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या