बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! रिषभ पंतने जेम्स अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का, पाहा व्हिडीओ

अहमदाबाद | भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे.  सध्या सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताची सुरूवात अडखळत झाली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारताने आघाडी घेतली आहे. यामध्ये रिषभ पंतने शतक ठोकलं. त्याला सुंदरही अर्धशतक ठोकत 60 धावांवर नाबाद आहे.

रिषभ पंत आणि वॉशिग्टंन सुंदरने भारताला आघाडी मिळवुन दिली. कसोटीच्या दिवसाचा दुसऱ्या खरा हिरो ठरला तो रिषभ पंत. भारतीय फलंदाजांना चांगली सुरूवात करता आली नाही. यामध्ये सलामीवीर गिल आणि विराट कोहली शुन्यावर बाद झाले. रोहित शर्माने एक बाजू सांभाळून लावून धरली होती. मात्र तोही 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंतने शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणलं.

या शतकी खेळीमुळे त्याचं कौतुक होत आहेच पण त्यासोबत आणखी एका गोष्टीमुळेही सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक होताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे रिषभ पंतने इंग्लंडचा स्पेशल कसोटी गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनला मारलेल्या रिव्हर्स स्वीपमुळे. पंत त्याच्या वैयक्तिक 89 धावांवर खेळत होता आणि अँडरसनला षटकातील पहिल्या चेंडूवर पंतने परफेक्ट टायमिंगसह फर्स्ट स्लीपच्या डोक्यावरुन अचूक रिव्हर्स स्वीप लगावला.

दरम्यान, महत्वाचं म्हणजे पंतने हा रिव्हर्स स्वीप मारल्यानंतर जेम्स अँडरसनचा चेहरा पाहण्यासारखा होता. चांगल्या-चांगल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने माघारी पाठवणाऱ्या अँडरसनला या तरूण पोरान मारलेल्या रिव्हर्स स्वीपने तोही आश्चर्यचकीत असावा.

 

थोडक्यात बातम्या-

‘चोर ज्यांना घाबरतात त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात’; कंगणाचं तापसी आणि अनुरागवर टीकास्त्र

“मी फोटो पाहिलेत, हात बांधून कोणी आत्महत्या करत नाही”

आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More