मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या उपचार घेत आहेत. तर सोशल मिडियावर एका नेटकऱ्याने फडणवीस बिहारच्या निकालामुळे नाटक करत असल्याचं म्हटलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्याचे कान टोचलेत.
रोहित पवार त्या नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाले, देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे जबाबदार पद आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळे त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे.
देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे.
दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत. https://t.co/K04fKRjkIk— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2020
दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायत आणि अनेकजण ते कबूलही करतायत, असंही रोहित पवार पुढे म्हणालेत.
गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः यासंदर्भात ट्विटरद्वारे माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
”सावरकरांचा पुळका’ असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत?’; राऊतांचा भाजपला सवाल
…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत
“एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा”
“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”
Comments are closed.