Top News

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे राहतो पण…- रोहित पवार

मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण महेबूब शेख आणि संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केलंय. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. महिलेच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असं मेहबूब शेख म्हणालेत.

जर काही केलं नसताना फक्त राजकीय द्वेषातून असे प्रकार व्हायला लागले, तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत. सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करू नये. दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन, असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय.

 

 

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या

शेतकरी-सरकारमधील सातवी बैठकही निष्फळ, अद्यापही तोडगा नाहीच

अभिमानास्पद! कराडच्या प्रगती शर्माने पटकावलं 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज

तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या