महाराष्ट्र मुंबई

“भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये”

मुंबई | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावं, अला टोला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपस गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणं मूर्खपणाचं आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारलंय, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”

कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ; कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊतांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त!

“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”

भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या