बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पैसे दिलेच नाहीत तर मग ईडी कशाला? हा मोदी सरकारचा राजकीय छळ”

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अधिकार दिले होते. सीबीआयने चौकशी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच ईडीने देखील अनिल देशमुखांविरोधात इसीआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हे केंद्र सरकारचं राजकीय छळ असल्याचं म्हटलं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, तसेच राजकीय सूडबुद्धीही आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केलं तरी सचिन वाझेंनी 100 कोटी जमवण्यास सांगितलं असं म्हटलं आहे. परमबीर सिंह यांनीही तेच म्हटलं आहे. पैसे दिले असं आरोपकर्तेही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशाच्या आधारावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला?, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

जर पैसे दिले असे ईडी आणि सीबीआयचं म्हणणं असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश”

टाॅमीला कुत्रा का म्हटलं?; कुत्र्याच्या नावावरून दोन कुटूंबात तुफान हाणामारी

कोरोनाचे नियम धाब्यावर, ‘या’ ठिकाणी मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

मोबाईल इंटरनेट शिवाय Whatsapp वापरता येणार; वाचा कसं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More