भिडे गुरुजी रडले, उदयनराजेंना नेमकं काय सांगितलं?

नवी दिल्ली | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल करण्यात आलेत. याप्रकरणी खासदार उद्यनराजेंनी राग व्यक्त केलाय.

आपलं भिडे गुरुजींशी बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. भिडे गुरुजी उद्यनराजेंना नेमकं काय म्हणाले…

-ते रडले, म्हणाले माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही

-मी त्यांना रडू नका म्हणून सांगितलं

-ते मला म्हणाले, महाराज माझ्या उभ्या आयुष्याची आता किती वर्षे राहिली? माझं कधीही काहीही होऊ शकतं.

-मी फक्त लोकांना प्रोत्साहान दिलं. हे केलं, ते केलं. 

-मिलिंद एकबोटेसुद्धा माझा मित्र आहे. ह्या लोकांना मी मनापासून सांगतो. कारण नसताना उद्रेक होईल असं वक्तव्य करु नका.