मुंबई | गृहमंत्री अमित शहा यांनी कोकण दौऱ्यावर असताना सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. या टीकेला शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, असं म्हणत अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
बंद खोलीत कधीच काही करत नाही अशा गजाली त्यांनी कोकणात येऊन केल्या. त्यामुळे कुणाचे मनोरंजन झाले असेल तर माहीत नाही, पण महाराष्ट्राने या गजाली गांभीर्याने घेतल्याचे दिसत नसल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं, असं अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
‘वा रे वा… महाराष्ट्राचे कारभारी लयभारी’; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोल
‘ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’; आव्हाडांचा अमित शहांना टोला
“भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत”
…तर माझ्या बापाची औलाद सांगणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
शेतात पत्नीसोबत शरीरसुखाचा आनंद घेतला, त्यानंतर उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल