Top News महाराष्ट्र मुंबई

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल

मुंबई | अरूणाचल प्रदेशमध्ये चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करत एक गाव वसवलं असल्याची माहिती समोर येत आहे. सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यातून ही गोष्ट समोर आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना सवाल करण्यात आला आहे.

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, असं एका ओळीचे परराष्ट्र धोरण खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जाहीर केलं आणि ते गाजलेही खूप. त्याच वक्तव्याला जागून भारतात चिनी गाव उभारणाऱ्या चिन्यांविरुद्ध पंतप्रधान नक्कीच एखादा ‘मास्टरस्ट्रोक’ मारतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?, असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना केला आहे.

दरम्यान, संपुर्ण गाव वसवलं मात्र आपल्या केंद्रीय सरकारला याची कानोकान खबर लागली नाही, अशी शंकाही सामनाच्या अग्रलेखामध्ये उपस्थित केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…”

‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

“शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायच याचा निर्णय घ्या”

शेवटी जिंकलोच!… मात्र हा व्हिडीओ करोडो भारतीयांच्या काळजाची धडधड वाढवतोय!

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या