बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईल- संभाजीराजे भोसले

सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणावरून राजकारणही पेटताना दिसत आहे. अशातच छत्रपती संभाराजे भोसले यांनी मराठा आरक्षणा संदर्भात उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरमध्ये ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असं खासदार संभाराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत.

ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करत आहे. अनेक्षर भाषांतरीत झाली नाहीत त्यामुळे हा फटका बसला असल्याचं संंभाजीराजे म्हणाले. भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी मी हा दौरा सुरु केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरावस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचे काम राज्याने करावे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची असल्याचं संभाजीराजे यानी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“मोदी सरकारने भारतीयांना पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा”

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका नाही; एम्सचे संचालक म्हणतात…

 पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

किंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More