बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल कपूरच्या घरी लगीनघाई; मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू

मुंबई | अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहे. अभिनेत्री सोनम कपूरची बहिण आणि अभिनेते अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आज विवाहबंधनात अडकणार असून सध्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. रिया कपूर झगमगत्या दुनियापासून जरी दूर असली तरी ती सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असलेली पाहायला मिळते.

रिया कपूर तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. रिया कपूरचा हा विवाहसोहळा तिच्या जुहू स्थित बंगल्यात पार पडणार असल्याचं कळतंय. हा सोहळा अगदी साधेपणानं आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

रिया आपल्याला पडद्यावर पाहायला मिळत नसली तरी ती चित्रपट निर्माती तसेच एका फॅशन ब्रँडची मालक आहे. या रिया कपूर आणि करण बूलानी गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आज अखेर ती लग्नबंधनात अडकणार आहे. 2010 मध्ये ‘आयशा’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रिया कपूर आणि करण बूलानीची पहिली भेट झाली होती.

दरम्यान, रिया कपूरचा हा विवाहसोहळा तिच्या जुहू स्थित बंगल्यात पार पडणार असल्याचं कळतंय. 2013 मध्येच दोघांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. तर ते सिरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र आज अखेर ते विवाहबंधनात अडकणार आहे.

थोडक्यात बातम्या –

राहुल गांधींना ट्विटरकडून दिलासा; आठवड्याभरानंतर अकाऊंट अनलाॅक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप

‘शिवसेनेच्या दहशतीमुळेच…’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

कोरोना लसीचा बूस्टर डोस ठरणार ‘या’ रुग्णांसाठी फायदेशीर!

“मला मुलंही आवडतात पण मी मुलीसोबतही लग्न करु शकते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More