बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रकाश आंबेडकरांना पराभूत करणाऱ्या ‘या’ खासदाराने घेतली मंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली |  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करणारे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

संजय धोत्रे हे शेतकरी चळवळीतले नेते मानले जातात. कृषीमंत्रीपद जर मला दिलं तर मला आनंद होईल, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं.

अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. संजय धोत्रेंनी प्रकाश आंबेडकरांचा अडीच लाख मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, संजय धोत्रेंना मोदी कोणतं मंत्रीपद देणार याकडे अकोल्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

-…अन् यावेळी रामदास आठवलेंनी न चुकता घेतली मंत्रीपदाची शपथ

-रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ; प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी??

-नरेंद्र मोदींच्या मातोश्रीने घरात बसून अनुभवला मुलाचा शपथविधी सोहळा

-नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली

-या भाजपच्या डॅशिंग आणि धडाडत्या नेत्या मंत्रीमंडळात नसतील!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More