बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांवर संजय राठोडांनी मौन सोडलं, म्हणाले…

नागपूर | एका तरूणीच्या आत्महत्येनंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात येतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता एका महिलेने संजय राठोड यांच्याविरोधात केलेल्या एका तक्रारीनंतर संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर आता त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार यवतमाळ पोलिसांकडे करण्यात आली होती. ही तक्रार पोस्टाने पाठवण्यात आली असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैगिंक छळ करतो, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. त्यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. त्या संस्थेशीही माझा संबंध नाही. राजकारणात विरोध केल्यानं माझ्यावर हे आरोप होत आहेत. माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय, असंही संजय राठोड म्हणाले आहेत. एका पत्राच्या आधारावर माझ्यावर हे आरोप केले गेले आहेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, एका संस्थेत असलेल्या संजय नावाच्या शिक्षकाला मॅसेज आले होते. या प्रकरणी मी वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे. संस्थेत कामाला लागलो पाहिजे या मानसिकतेतून हा प्रकार घडला असावा, असं देखील राठोड म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अखेर 8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक!

“चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे, इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार”

‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More