“शिवतीर्थावरचा कालचा भोंगा भाजपचा आणि स्क्रिप्टही त्यांचीच”
मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेनेची (Shivsena) युती तुटली. याबद्दल बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. काल मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भाजप आणि आमच्यात काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. तुम्ही तुमचं पाहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवाजी पार्कातील कालचा भोंगा भाजपचाच होता, असा म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, काल शिवतीर्थावरचा भोंगा भाजपचाच होता असं म्हणताना भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. तर अक्कलदाढ उशीरा कशी येते? हे एकच महाराष्ट्राला काल दिसलं, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
युक्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर; विकृत अवस्थेत सापडले ‘इतके’ मृतदेह
सर्वसामान्यांना पुन्हा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं; वाचा ताजे दर
“…म्हणून मी राज ठाकरेंना अधिक गांभीर्याने घेत नाही”
UPA अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही”
Comments are closed.