बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते”

नाशिक | 16 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. बाळासाहेब म्हणायचे, तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते खंत नाही. मला बरोबर माहीत आहे मी काय बोललो ते. बाळासाहेबच म्हणायचे भुजबळ गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते, असं भुजबळांनी सांगितलं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत नाशिकमध्ये होते. यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवण्यात आलं आहे. असे अनेक लोकं आहेत दुर्देवी, ज्यांनी शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात गेले. पण त्यांच्या नशीबी काय आलं शेवटी? ठिक आहे. कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झाला असेल, पण शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत हे शरदर पवारांचे प्रवक्ते आहेत, या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून सोमय्यांना स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार पाठवला. मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे परग्रहावरून आलेत का? ते देशाचे मोठे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहित नसेल म्हणून सांगतो, मोदी पवारांना गुरु मानतात, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

शेतमालाला ग्राहक नाही; संतप्त शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल; पाहा व्हिडीओ

“रुपाली चाकणकर… पहिली भेट या गावाला द्या”

“समीर वानखेडेंची नोकरी जातेय की, मलिकांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More