महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत- संजय राऊत

मुंबई | कमी जागा येऊनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर त्यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भाजप नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद देईल. कारण शब्द पाळला नाही तर काय उलथापालथ होऊ शकते, हे महाराष्ट्राने भाजपला दाखवून दिलं आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना दिलेला शब्द फिरवणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

बिहारमध्ये भाजपचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजप आपल्या मित्रांशी तसं करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, कधी कधी लोक सामना हारतात. पण हारणाऱ्या संघाच्या खेळाडूला संघर्ष करत संघाला पुढे नेल्याबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ दिलं जातं. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासारखा एक चेहरा राष्ट्रीय राजकारणातील नवा चेहरा म्हणून पुढे आला आहे, असं मत राऊतांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश”

“शब्द पाळला नाही तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलाय, त्यामुळे…”

शिवसेनेला बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

“नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी”

मुंबई पोलिसांच्या समन्सानंतरही मुंबईत हजर राहण्यास कंगणाचा नकार, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या