satej Patil - निवडणुकीसाठी सरकार शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करतंय!
- महाराष्ट्र, मुंबई

निवडणुकीसाठी सरकार शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करतंय!

मुंबई | शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. मात्र हा फॉर्म भरुन घेऊन सरकार निवडणूक समोर ठेवून शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहे, असा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला.

घरातील १८ वर्षांखाली आणि त्यावरील अपत्यांची माहिती घेतली जात आहे. ८९ लाख शेतकरी आणि त्यांची माहिती सरकार निवडणुकीसाठी वापरणार असल्याचं सतेज पाटील म्हणाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा