बंगळुरू | देशात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आपले आमदार फुटू नयेत याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली होती. राज्यस्थानमध्ये भाजपच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती आहे. देशात काही ठिकाणी मतदानावर आक्षेप देखील घेण्यात आला आहे. त्यातच कर्नाटकमध्येही क्रॉस व्होटिंग झालं आहे. जनता दलाच्या एका आमदाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचं खुलेआम सांगितलं आहे.
जनता दलाचे आमदार श्रीनिवास गौडा यांना कोणाला मतदान केलं?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. माझं काँग्रेसवर प्रेम आहे. त्यामुळेचं मी काँग्रेसला मत दिलं आहे, असं श्रीनिवास गौडा यांनी सांगितलं आहे. श्रीनिवास गौडा यांनी यापुर्वी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच आता काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं आहे.
आमदार श्रीनिवास गौडा यांच्याप्रमाणेच श्रीनिवास गुब्बी यांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी तीनही पक्षांनी ताकद पणाला लावली होती. मात्र, दोन आमदारांनी क्रॉस वोटींग केल्याने गोंधळ उडाला आहे. आम्हाला काँग्रेसला मत देणे योग्य वाटते, असं त्यांनी म्हटलं आहे. राजस्थान आणि कर्नाटकात क्रॉस व्होटिंग झाल्याने राज्यसभेचा निकाल बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राजस्थानमधील भाजप आमदार शोभाराणी कुशवाह यांनी देखील क्रॉस व्होटिंग केलं आहे. शोभाराणी यांनी भाजपच्या घनश्याम तिवारींऐवजी काँग्रेसच्या प्रमोद तिवारींना मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यातच दोन राज्यांमध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
Rajyasabha Election | भाजपला मोठा झटका, भाजप आमदाराचं काँग्रेसला मतदान
President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार
एकनाथ खडसेंचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी! दिल्ली पोलिसांचा असदुद्दीन ओवैसींना दणका
‘…तर आम्ही पण बांगड्या घातल्या नाहीत’; उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा
Comments are closed.