Top News महाराष्ट्र मुंबई

“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”

मुंबई | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा 73दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आत्तापर्यंत शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत मात्र शांततेने आंदोलन करत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजपची असेल, असं म्हणत शरद पवारांनी भाजपला इशारा दिला आहे.

आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते संवेदनशील नाहीत. विरोधी पक्षांच्या खासदारांना गाजीपूर सीमेवरील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचादेखील समावेश असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, सर्व खासदार शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी चालले होते, तर त्यांना अडवलं गेलं. जर लोकशाहीत असं घडत असेल तर याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने करभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

तात्या विंचूला जिवंत करणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड

“70 दिवसांपासून मुग गिळून गप्प बसलेले आता तोंडं उघडायला लागलेत”

अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, तुम्ही पाहणार का???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या