…आणि शहांनी दानवेंना मातोश्रीच्या सभागृहातच बसवून ठेवलं!

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र यावेळी उपस्थित रावसाहेब दानवेंना बैठकीला बसू दिलं नसल्याची माहिती आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे बैठकीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक दुसऱ्या मजल्यावर होती, मात्र या बैठकीत दानवेंना सहभागी न करता त्यांना सभागृहातच बसवण्यात आलं.

विशेष म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या बैठकीला बसू देण्यात आलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या