पुणे | संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक आणि शेतकरी किसान मोर्चा आंदोलनाचे समन्वयक तसेच मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचा चेहरा असलेल्या शांतारामबापू कुंजीर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५५ वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वी सर्व्हिकल स्पाईनच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं, मात्र त्रास जाणवू लागल्याने सोमवारी रात्री त्यांना जहाँगीर रुग्णालयात दाखल करावं लागलं, तिथंच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बहुजन समाजाच्या चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता ते झुंजार सेनापती अशी त्यांची ओळख होती. त्यांनी वेगवेगळ्या 20 ठिकाणी नोकरी केली या काळात मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कामास सुरुवात केली. 2005 मध्ये ते संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत झाले.
मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर फोडल्याचा गुन्हा शांताराम बापूंवर होता. विविध संघटनांच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, D.Ed. च्या विद्यार्थ्यांचा स्टायपेंडचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, नवोदित लेखकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी आत्तापर्यंत दहा पुस्तकांचे प्रकाशन, असं सामाजिक काम बापूंनी केलं आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले
“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”
महत्वाच्या बातम्या-
“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”
काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत
कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Comments are closed.