शरद पवार यांच्यापुढे व्यथा सांगताना शेतकऱ्याला रडू कोसळलं

शरद पवार यांच्यापुढे व्यथा सांगताना शेतकऱ्याला रडू कोसळलं

यवतमाळ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यापुढे व्यथा सांगणाऱ्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

6 एकर शेती आहे मात्र यावर्षी शेतात 6 क्विंटल कापूसही आला नाही. मात्र मला शासनाने कोणतीही मदत दिली नाही. माझ्यावर युनियन बँकेचे 5 लाख रुपयांचे कर्ज आहे पण मी ते भरु शकत नाही अशी परिस्थिती आहे, असं सांगताना या शेतकऱ्याला रडू कोसळलं. 

आमचे शासन ढोंगी असल्यासारखे आहे. तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यावे, अशी विनंतीही या शेतकऱ्याने यावेळी शरद पवार यांना केली. 

Google+ Linkedin