बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

नवी दिल्ली | सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते दिल्लीत मुक्कामाला आहेत. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता दिल्लीत शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात भेट झाली आहे.

शरद पवार आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेवरून ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत गदारोळ घातला आहे. याच विषयावर या भेटीत चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीत ममता बॅनर्जी विरोधी पक्षाच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतीच त्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात दिल्लीत मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी नेहमी भेटीगाठी झाल्यानंतर फोटो शेअर करतात. परंतू त्यांच्या या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, सध्या विरोधीपक्षाने पेगॅससच्या मुद्यावरून संसदेत गोंधळ घातला आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज जवळपास ठप्प झालंय. त्यामुळे मोदींनी नितीन गडकरी यांच्यावर विरोधकांना समजवण्याची जबाबदारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळेच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं माहिती मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”

पुणे मेट्रोच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, ते आमच्या मागण्या नक्की पुर्ण करतील”

‘माफी मागून, 25 कोटींची भरपाई द्या’, शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव

आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांच्या समोर; कोल्हापुरात उद्धव ठाकरे अन् फडणवीसांची धावती भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More