पुणे | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांसारखी चिकाटी हवी. लोकांशी संपर्क कसा करायचा हे संघाकडून शिका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
विधानभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पुण्यातील भोसरीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
‘आरएसएस’चे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात पण जातातच, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
आत्तापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं. म्हणजे फक्त निवडणुका दरम्यान आठवण काढली का? असा सवाल मतदार उपस्थित करणार नाहीत, असा सल्ला पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-“भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार; राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे”
-सार्वजनिक बँकांना बुडवण्यात भाजप नेते पु़ढे; ‘या’ नेत्यावर काँग्रेसने केला आरोप
-एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी; कारभार पारदर्शी नसल्याचा लोकयुक्तांचा ठपका
-नव्याचे नऊ दिवस असतात; अजित पवारांचा रणजितसिंह निंबाळकरांना टोला
-छत्रपतींच्या जयघोषाने रायगड दुमदुमला; महाराष्ट्रभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
Comments are closed.