मुंबई | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना भारतातील हजारो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे.
विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून आतोनात प्रयत्न सुरू आहेत. त्यात रशियाने खार्किव येथे केलेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवरून मोदी सरकारला सल्ला दिला आहे.
मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री.एस जयशंकजी यांना विनंती करतो की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य, या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि चिंता समजून घ्या. अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने बचाव प्रयत्नांना गती दिली पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी ट्विट करत खार्किव येथे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर हजारो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये कठोर हवामानात आणि अन्नाशिवाय अडकले आहेत, असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारला विद्यार्थ्यांना लवकरात लवकर युक्रेनच्या बाहेर काढा, असा सल्ला दिला आहे.
Government of India must speed up the rescue efforts to evacuate the stranded students at the earliest.#IndiansInUkraine #NaveenShekharappa
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 1, 2022
थोडक्यात बातम्या-
“…पण ज्यांना मुल बाळ नाही त्यांना काय कळणार”
“अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे, पायात पाय अडकून पडेल”
उदयनराजेंचा हटके अंदाज! हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग; पाहा व्हिडीओ
महाशिवरात्रीला भांगचा हँगओव्हर झालाय? मग करा ‘हे’ 6 घरगुती उपाय
“प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची, असं हे भाजपचं राजकारण”
Comments are closed.