बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले”

नवी दिल्ली | मी भाजप सोडल्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे डोळे पाणावले होते पण त्यांनी माझ्या निर्णयाला विरोध न करता मला भरभरून आशिर्वाद दिले, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे. .

भाजप हा लोकशाहीवादी पक्ष होता. पण आता पक्षाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे. आज सर्व काम पंतप्रधान कार्यालयातून होत आहेत. कोणत्याही मंत्र्याला अधिकार नाहीत, असं म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर घणाघात केला आहे.

भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकलं आहे. मी सत्याच्या बाजूने उभं राहिलो ही माझी चूक ठरली, असं म्हणत सिन्हांनी भाजपला टोमणा मारला आहे.

भाजप स्थापनादिनीच सिन्हांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-राज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही म्हणणार ‘लाव रे तो व्हीडिओ’!

-1972 पेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण- शरद पवार

-न थकता खोटं बोलणं म्हणजे ‘मोदी लाय’, इंग्रजी डिक्शनरीत नवा शब्द; राहुल गांधींचा मोदींना टोला

-भाजपला एकहाती सत्ता मिळणार नाही; संजय राऊत यांचं भाकित

-“अमित शहा देव नसतीलही पण ममताही दुर्गा नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More