बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला केंद्र सरकारचा दणका

मुंबई । शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यामागे ईडी चौकशी लागली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात कारवाईसाठी अनेक प्रयत्न केले होते.

परबांचे दापोलीमध्ये असलेल्या साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट जमिनदोस्त होणार आहेत. केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हे दोन्ही रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. सीआरझेड आणि ना विकास क्षेत्रामध्ये या दोन्ही रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे सीआरझेड कायदा 2011 चा भंग झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर हातोडा चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करून त्या ठिकाणी झाडे लावून ते क्षेत्र विकसित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ही कारवाई लक्षात घेता किरीट सोमय्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More