शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबाद | शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. शिवजयंती केव्हा साजरी करायची या वादातून ही हाणामारी झाल्याचं कळतंय.

19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली, मात्र शिवसेना तिथीनूसार शिवजंयती साजरी करते. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आज याच कार्यक्रमाचं समर्थनगरमध्ये उद्घाटन होणार होतं. 

दरम्यान, कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती एकच असली पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर पेटलेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.