बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दादा दचकू नका, महाराष्ट्रातील राजकारणात पहाट योग एकदाच आला पण…”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतलाय.

पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत, असा टोला शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.

राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

…त्यावेळी मंत्री रामदास आठवले कुठे होते?- स्वरा भास्कर

…अन् ट्विटरवर राहुल तेवातियाने स्वतःलाच केलं ट्रोल!

वडिलांना गमावलं आणि 3 महिन्यांनी आईलाही, सामन्यानंतर राशिद खान झाला भावूक

वायनरीत आला वाईनचा महापूर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More