Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर विश्वास नाही; सामनातून टीकेचे बाण

मुंबई | कोरोनाचे युद्ध जनताच लढणार आहे आणि त्या युद्धात जनताच मरणार आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर विश्वास नाही. राज्यपाल हे महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख पण ते ही दिल्लीच्या मार्गाने निघाले. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचं शासन असते आणि हे असं अतरंगी वर्तन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी वा राज्यपालांनी केले असते तर भाजपच्या मंडळींनी महाराष्ट्रात तांडव केले असते, अशी जोरदार टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला परत मिळावेत. म्हणजे, मोदींच्या खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्री ठाकरे यांनाही कोरोनाचे युद्ध लढता येईल, अशी अपेक्षा अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे.

आई जगदंबा त्यांना लवकरच सद्वर्तनाची, महाराष्ट्रनिष्ठेची सुबुद्धी देईल याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही. कोरोनाशी लढण्यासाठी मोदी सरकारला पैसा हवा आहे. तसा तो आपल्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारलाही हवाच आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकवेळ जेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरून कोरोनाविरोधातील सैन्य (जनता) पोटावर चालते साहेब, किती उपाशी कसे ठेवायचे. शेवटी तेच हे युद्ध लढणार आहे आणि मरायला पण तयार होणार आहे, असा निशाणा सेनेने भाजपवर साधला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना राहू द्या, आधी आव्हाडांपासून वाचवा- निरंजन डावखरे

धक्कादायक! महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या 150 नव्या रुग्णांची नोंद

महत्वाच्या बातम्या-

निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या 50 ते 60 लोकांचे फोन बंद; पोलिसांकडून शोध सुरु

“सरकारने 2 वर्षे जाहिराती बंद कराव्यात आणि तो पैसा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी वापरावा”

“जितेंद्र आव्हाड जी…मौका सभी को मिलता है”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या