Top News महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा”

मुंबई | काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद हे भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे, असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. यावर शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

रवी राजा यांनी जरी शिवसेनेवर आरोप केले असतील तरी त्यांनी लक्षात घ्यावं की शिवसेनेमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे. शिवसेनेने सहकार्य केलं नसतं तर त्यांना हे पद मिळालं नसतं, असं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.

रवी राजा आता असं का बोलत आहेत माहीत नाही. पण जर महाविकास आघाडीवर परिणाम होईल असं म्हणत असतील त्यांनी ही धमकी देऊ नये, असंही जाधव म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे. आमच्यावर दबाव टाकण्यासाठी दोन्ही जुने मित्र या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राजांनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

“सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे”

कोरोनावर मात करत ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरूजींनी दिला ‘हा’ कानमंत्र

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाचे रूग्ण आढळले महाराष्ट्रात, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“कंगणा राणावतने भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली”

DYSP पैलवान राहुल आवारेने आपले गुरू काका पवारांच्या लेकीला बनवलं जीवनसाथी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या