“उद्धव ठाकरे यांनी आम्हाला रामलल्लाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं”
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केलंय, मात्र या भावनिक आवाहनाला बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पत्र लिहून उत्तर दिलंय, हे पत्र अत्यंत स्फोटक असून त्यात उद्धव ठाकरेंनी आम्हाला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाऊ दिलं नाही, असा स्फोटक आरोप संजय शिरसाट यांनी केलाय.
आम्हाला आपल्या वर्षा निवासस्थानाची दारं बंद होती, तुम्हाला भेटण्यासाठी बडव्यांकडून वेळ घ्यावी लागायची, ती मिळत नसे, मिळाली तरी तासनतास वाट पाहात ठेवायचे, असा आरोप संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मंडळींवर केला आहे. मात्र याउपरही थेट उद्धव ठाकरे यांच्यावरही एक आरोप केला जातोय तो अत्यंत गंभीर मानला जातोय.
हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे सर्व मुद्दे शिवसेनेचे आहेत ना?, मग आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला का जावू दिलं नाही. आम्ही विमानात बसण्याच्या तयारीत होतो, आमच्या लगेची तपासणी देखील झाली होती. तेवढ्यात आपण एकनाथ शिंदे साहेबांना सांगून आम्हा आमदारांना अयोध्येला जाऊ दिलं नाही. तुमच्या एका निरोपामुळे आम्हाला थेट घरी जावं लागलं. आम्हाला रामलल्लाचं दर्शना का घेऊ दिलं नाही?, असा सवाल शिरसाट यांनी केलाय.
नुकताच आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला यावेळी हे आमदार अयोध्येला निघाले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना अयोध्येला जाऊ दिलं नाही. यामागे त्यांचं काय समीकरण होतं, हे कळू शकलेलं नाही, मात्र आदित्य ठाकरे यांनाच या दौऱ्यात फोकस मिळावा, असा उद्धव ठाकरे यांना हेतू असू शकतो, असं मानलं जात आहे. मात्र असं असलं तरी आमदारांना रामलल्लाच्या दर्शनापासून रोखल्यानं या विषयाची आता चर्चा रंगू लागली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मला उमेदवारी दिली असती तर..’; छत्रपती संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
खळबळजनक: उद्धव ठाकरेंना भेटण्यास शिवसेना आमदारांना सहन करावा लागायचा असा प्रकार!
प्रति, उद्धव ठाकरे, पत्रास कारण की… संजय शिरसाट यांचं स्फोटक पत्र
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”
“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ
Comments are closed.